सांगली/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे पर्यावरण अधिकारी राजेश वावरे यांची महाराष्ट्र पर्यावरण संघटनेच्या उपाध्यक्षपदी
निवड झाली आहे.
महाराष्ट्रातील साखर कारखाने, आसवानी, इतर उपपदार्थ उद्योगात
पर्यावरण अधिकारी या पदावर
कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र पर्यावरण संघटनेच्या अध्यक्षपदी इंदापूर कारखान्याचे जितेंद्र माने-देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे राजेश वावरे यांची बिनविरोध निवड झाली.
महाराष्ट्र पर्यावरण संघटनेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.१० सप्टेंबर रोजी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना,सांगली येथे पार पडली. यात पाच वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड झाली. यात अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचे सह १५ संचालकांची निवड झाली. नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत होत आहे.