नेवासा
“श्रीकृष्ण बोलो हरे मुरारी..हे नाथ नारायण वासुदेवा” चे नाम-चिंतन व “राधे राधे” च्या जयघोषात वृंदावन नगरीत महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या तीन दिवसीय श्रीकृष्ण कथा सोहळ्याची सांगता झाली. सोहळ्यानंतर सर्व सदगुरु नारायणगिरी महाराज भक्त परिवारांचे तिर्थक्षेत्र उज्जैनला प्रस्थान झाले.
नेवासा बुद्रुक येथील सदगुरु नारायणगिरी महाराज आश्रमाच्या वतीने ओंकारेश्वर,उज्जैन,वृंदावन,
मथुरा व आग्रा यात्रा व वृंदावन धाम येथे श्रीकृष्ण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त सत्संग म्हणून तीन दिवसीय कथा सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सांगता सोहळ्यात श्रीकृष्णांचे गोकुळातील लिला व प्रसंग सांगून कंस वध व गोवर्धन कथेचे निरुपण करण्यात आले. सप्तपुरा स्थानाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
कथा सांगता नंतर झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतसेवक रमेश शिंदे यांनी केले. काकासाहेब कोते,विनायक दरंदले,सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी सुदाम बनसोडे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर माऊली शिंदे,सेवानिवृत्त प्राध्यापक किशोर धनवटे,सुभाष महाराज जगताप, बाबासाहेब खुळे ,शिवाजीराव मगर यांचे भाषण झाले. यात्रेकरुंच्या वतीने नेवासेचे माजी सरपंच शंकरराव लोंखडे, विष्णुपंत ठोसर व विनायक दरंदले यांनी उध्दव महाराज यांचा सत्कार केला. विश्वनाथ महाराज मंडलिक,अंकुश महाराज जगताप,कृष्णा महाराज, नामदेवराव शिंदे,मोहन ब्रीजवासी,आण्णा महाराज वावरे,बाबासाहेब महाराज सातपुते,संतोष महाराज दारकुंडे,भारत महाराज धावणे
व विविध गावातील संतसेवक उपस्थित होते.यात्रा व कथा सोहळा यशस्वी करणा-यांचा सत्कार करण्यात आला. सिताराम झिने यांनी आभार मानले.
महंत उध्दव महाराज..
वृंदावन येथील स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व असताना येथील मुलभूत प्रश्नांची होत असलेली दुरावस्था,भाविकांची होणारी गैरसोय व दिशाभूल करण्याचा प्रकार बघता आध्यात्मिक क्षेत्राला त्रासाच्या बंधनातून मुक्त करणे गरजेचे आहे असे सांगून उध्दव महाराज यांनी जागृत भक्तांनी याबाबत संबंधितांना जाब विचारणे गरजेचे असल्याचे सांगितले.