Thursday, October 5, 2023

चौंडीतील धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला बीआरएस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या नेत्या नीलमताई खेमनार यांची भेट चर्चा करून दिला पाठींबा

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय  महाराष्ट्र न्यूज:गेल्या ७० वर्षांनपासुन सुरु असलेले धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर बांधव चौंडी येथे आमरण उपोषणास बसले आहेत. मात्र बारा दिवस होऊनही राज्य सरकारने याची दखल घेतली नाही.

भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या नेत्या नीलमताई खेमनार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर हे गेल्या बारा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत.

त्यांना बीआरएस पक्षाच्या वतीने पाठींबा दिला व चर्चा केली व वेळप्रसंगी बीआरएस पक्ष रस्तावर पण उतरण्यासाठी मागे पुढे बघणार नाही असे नीलमताई खेमनार यांनी सांगितले . त्यांच्या समवेत बीआरएस पक्षाच्या इतर महिला पदाधिकारी पण होत्या.

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी चोंडी येथे उपोषण करत असलेल्या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली आहे . गेली सत्तर वर्षे झाले धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब

आंबेडकर यांनी घटनेमध्ये 36 क्रमांकावर धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिलेले आहे परंतु या महाराष्ट्रातील प्रस्थापित व जातीयवादी पक्षांनी धनगर समाजाच्या तीन पिढ्या बरबाद केल्या‌. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण ताबडतोब देण्यात यावे अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे .

धनगर समाज हा शांतता प्रिय समाज आहे . कुठलीही अनुसूचित घटना या समाजाकडून अद्याप झालेले नाही . परंतु आता समाजाची सहनशीलता संपलेली आहे. तरी या महाराष्ट्र सरकारने ताबडतोब धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देण्यात यावी अशी मागणी नीलमताई खेमनार यांनी केली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!