नेवासा
तालुक्यातील सोनई येथून देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारे २ आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
याबाबद अधिक माहिती अशी की,
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, शदर बुधवंत, पोना रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, पोका राहुल सोळुंके व चापोहेकॉ अर्जुन बडे अशांना जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारा बाबत माहिती घेताना पोनि श्री. आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, विशाल महाडीक रा. राहुरी हा साथीदारासह गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगुन त्याची विक्री करण्यासाठी काळे रंगाचे मोटार सायकलवर घोडेगांव ते अहमदनगर रोडवरील मातोश्री लॉजिंग परिसरात येणार आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोनि श्री.आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळविली व पंचाना सोबत घेवुन, खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले.
पथकाने लागलीच नगर घोडेगांव रोडने मातोश्री लॉजिंग परिसरात जावुन सापळा लावुन थांबलेले असताना. थोडाच वेळात काळे रंगाचे पल्सर मोटार सायकलवर दोन संशयीत इसम लॉज जवळ येवून थांबले. पथकास त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने दोघांना शिताफिने ताब्यात घेतले. ताब्यातील संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल संजीत महाडीक (वय ३२) रा. मानोरी, ता. राहुरी व सागर साहेबराव खांदे (वय २३), रा. येवला आखाडा, ता. राहुरी असे असल्याचे सांगितले. त्याची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुस मिळुन आले. त्याबाबत त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने आणल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना ३० हजार रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा, १ हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुस व ५० हजार रुपये किंमतीची काळे रंगाची हिरो होंडा कंपनीची एक स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण ८१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोना ज्ञानेश्वर नामदेव शिंदे ने स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी सोनई येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. ४३७ / २०२३ आर्म अॅक्ट ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही सोनई पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपी सागर साहेबराव खांदे हा सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द ओतुर, पोलीस स्टेशन जिल्हा पुणे गु.र.नं. ४१४ / २०२२ भादविक ३९४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक
राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर,
उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव सुनिल पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.