अहमदनगर:बाबुर्डी घुमट येथील अप्पासाहेब लांडगे यांचा अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी कशासाठी केली, मर्डर असताना पोलिसांनी राजकीय दबावामुळे अशी नोंद केली आणि गुन्हा नोंद करण्या साठी टाळाटाळ का केली, नगर तालुका पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे असा प्रश्न कृषि पदवीधर संघटना चे नेते महेश कडूस पाटील यांनी विचारला आहे..
बाबुर्डी घुमट येथील सामान्य शेतकरी अप्पासाहेब लांडगे यांना किरकोळ कारणावरून मारहाण करून त्यांना जिवे मारण्यात आले असून त्यांचे कुटुंबीय दहशती खाली आहेत. दक्षिण नगर मधील दारू अड्डे, जुगार धंदे जोरदार सुरू असून क्राईम रेट वाढलेला आहे. पोलिसांनी वचक ठेवण्याचं काम न करता राजकीय लोकांना पाठीशी घालण्याचे काम सध्या तालुक्यात सुरू आहे. नगर तालुक्याचा बिहार करण्याचे काम सध्या पोलीस व राजकीय नेते करीत असल्याची टीका देखील महेश कडूस पाटील यांनी केली आहे.
लांडगे मृत्यू प्रकरणात मुख्य आरोपी जरी अटक करण्यात आला असला तरी त्याचे सह आरोपी आई वडील यांना अटक करण्याची मागणी कडूस पाटील यांनी केली आहे. लांडगे कुटुंबाला पोलीस संरक्षणाची गरज असून, आरोपी चे आरोपी आई वडील अटक न केल्यास कृषि पदवीधर संघटना कडून आंदोलन केले जाईल असा इशारा महेश कडूस पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. या विषयावर योग्य कारवाई न झाल्यास महेश कडूस पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.