नेवासा
नेवासा तालुक्यातील सोनई येथील पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेच्या ध्यानमंदीरात प्रसिद्ध विनोदी साहित्यिक व व्याख्याते डाॅ.संजय कळमकर व शिवप्रसाद महाराज पंडित यांच्या हस्ते श्रीगणेशाचे पूजन व आरती सोहळा मोठ्या भावभक्तीत व उत्साहात संपन्न झाला.
पर्यावरणपूरक ‘श्री’ चे पूजन उद्योजक संतोष क्षिरसागर,संजय शहा व गोपीनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. येथे तयार करण्यात आलेला पर्यावरणपूरक गडजेजुरीचा किल्ल्याची आरस तयार करणा-या भगवान तुळशीराम तेलोरे या कलाकाराचा सत्कार विठ्ठल महाराज खाडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आनंदवनचे अध्यक्ष उदय पालवे, उपाध्यक्ष विनायक दरंदले, डाॅ.तुषार दराडे,कृष्णा सुद्रिक, किशोर घावटे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
आनंदवन संस्था विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रमाच्या माध्यमातून आनंद देण्याचा व घेण्याचे मोठे कार्य करीत आहे. गणेश उत्सवात समाजास आनंद देण्याचे पसायदान कौतुकास्पद आहे असे डाॅ.कळमकर यांनी भाषणात सांगितले. पंडित महाराज यांनी गणेश उत्सवाची पौराणिक कथा सांगितली. प्रास्ताविक भाषणात संस्थेचे सचिव संजय गर्जे यांनी संस्थेच्या विधायक कार्याची माहिती दिली. राजेंद्र सानप, विशाल भळगट , सच्चिदानंद कुरकुटे, अजय गर्जे,संदीप घोलप उपस्थित होते. डाॅ.तुषार दराडे यांनी आभार मानले.
————————————–