गुहा प्रतिनिधी : राहुल कोळसे :पारनेर तालुक्यातील भाळवणी नजीकच्या माळकुप याठिकाणी सुरू होत असलेल्या कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड हा कारखाना पुणे जिल्ह्यातील श्रीनाथ म्हसोबा साखर कारखान्याची
दुसरी शाखा असुन या साखर कारखान्या मार्फत गुरूवार 5 ऑक्टोबर रोजी राहुरी तालुक्यात ठिकठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या शेतकरी मेळावा व बैठकीला कारखान्याचे अध्यक्ष महेशजी करपे,उपाध्यक्ष अनिलजी मोहिते ,
कार्याध्यक्ष श्री रवीशेठ भुजबळ,संचालक ,भाऊसाहेब आव्हाळे,संचालक डॉ मते,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश मते,शेतकी अधिकारी शिवाजी जंजिरे उपस्थित राहणार आहेत.तसेच टाकळीमिया येथे गुरुवार दि.०५/१०/२०२३ रोजी
सायंकाळी ठिक ०५:०० वा. महादेव मंदिर टाकळीमिया याठिकाणी भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला आहे .कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड हा कारखाना साखर, इथेनॉल, बायोईलेक्ट्रिसिटी व बायोगॅस निर्मिती करणार आहे . राहुरी तालुका
हा उसाचा भाग म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात उस उत्पादक शेतकरी या भागात आहे.या कारखान्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.तरी शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवाजी जाधव , विजय मोरे ,अविनाश भुजाडी यांनी केले आहे.