नेवासा
नेवासा फाटा येथील जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे यांची द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार बाबासाहेब यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
राजेंद्र वाघमारे यांनी एक निर्भीड पत्रकार म्हणून आतापर्यंत विविध दैनिकांमधून आपली सामाजिक व राजकीय भूमिका सडेतोडपणे मांडली असून त्यांच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेत ग्रामीण भागातील पत्रकारांना एका छत्राखाली आणण्यासाठी त्यांची ही निवड करण्यात आली असल्याचे दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे यांनी द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्य सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या पत्रकार क्षेत्रातील विविध संघटनांनी अभिनंदन केले आहे.
ग्रामीण भागातील पत्रकारांच्या विविध प्रश्न समस्या आपण संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे मांडून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार राजेंद्र वाघमारे यांनी नियुक्ती नंतर बोलताना केला आहे.