Thursday, August 11, 2022

नगर मोठी बातमी:माजी सरपंचाची निघृण हत्या ;पॅरोलची रजा उपभोगत असताना झाला घात…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच राजाराम शेळके यांची निघृण हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शेळके हे त्यांच्या शेतात काम करत होते.

त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी शेळके हे एकटेच होते. दुपारी एकच्या सुमारास त्यांच्यावर मारेकर्‍यांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आले. त्यात त्यांच्या मानेला गंभीर जखम झाली. त्यांना तातडीने शिरुर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

१३ नोव्हेंबर २०१० रोजी पुणे-नगर रोडवरून नारायण गव्हाण शिवारातून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी डोक्यात गोळ्या झाडून कांडेकरांची हत्या केली. या हत्येमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. कांडेकरांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता त्यांच्या डोक्यातील गोळी गायब करण्यात आली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक अशोक रजपूत यांनी १४ आरोपींना अटक करून दोषारोपपत्र दाखल केले होते. राजाराम शेळके हे दहा वर्षापूर्वी नारायाणगव्हाणचे माजी सरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्याकांडातील आरोपी होते. त्यांच्यासह कांडेकर खून प्रकरणात आणखी काही आरोपी होते.

राजाराम शेळके आणि त्यांच्या मुलाला या गुन्ह्यात शिक्षा लागली होती. कोरोना संसर्ग वाढल्याने त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. पॅरोलची रजा उपभोगत असताना त्यांनी गावातील शेतात काम चालू केले होते आणि हे काम चालू असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शेळके यांचा खून म्हणजे बदला घेतल्याचाच प्रकार असल्याची चर्चा झडत आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!