माय महाराष्ट्र न्यूज :मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा कोपर्डी मधून रणशिंग फुंकले जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज हे उद्या (१२ जून) कोपर्डी या ठिकाणी भेट देणार आहेत.
यावेळी ते ग्रामस्थांची व सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे. त्यामुळे कोपर्डीतूनच पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे.कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ या दिवशी संध्याकाळी संपूर्ण राज्यात थरकाप उडवणारी घटना घडली.
या घटनेनंतर संपूर्ण मराठा समाज एकत्र येत लाखोच्या संख्येने राज्यामध्ये शांतता मार्गाने मोर्चे काढले गेले, आणि येथेच मराठा आरक्षणाची खरी मुहूर्तमेढ रोवली गेली.त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आलेला असतानाच छत्रपती संभाजी महाराज हे कोपर्डीला येत आहे. यावेळी त्यांच्या समवेत राज्यातील मराठा समाजाचे सर्व समन्वयक व सर्व मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
तरी यावेळी नगर जिल्हा व आसपासच्या जिल्ह्यातील सर्व मराठा समाजातील बांधव प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक संजीव भोर पाटील यांनी केले आहेे.