माय महाराष्ट्र न्यूज:”हवी तर सवलत दिली जाईल, मात्र वीज बिल माफ होऊ शकत नाही”, असे स्पष्ट मत ऊर्जामंत्री नितीन राऊत व्यक्त केले. मंत्री राऊत हे अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहात थांबले असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
मंत्री राऊत म्हणाले सार्वजनिक कंपन्या चालवण्यासाठी पैसे लागतात. त्यामुुळे वीज बिल माफ होऊ शकत नाही. ते भरावेच लागेल.वीज बिल माफ करण्याचे काम केंद्र सरकारचे आहेे. केंद्र सरकारने मदत केली, तर राज्य सरकारही पुढे येईल.
माफीची घोषणाच :
मंत्री राऊत यांच्या वीज बिलाच्या भूमिकेवरून राज्य सरकारची वीज बिल माफ करणे, ही केवळ घोषणाच ठरल्याचे दिसते. त्याचबरोबर थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम तीव्र होणार असल्याचेही दिसून येत आहे.