Thursday, August 11, 2022

पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गावरून अकोले संगमनेर तालुक्याचा वाद पेटण्याची शक्यता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पूर्वनियोजित अकोल्यातुन पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग इतर तालुक्यातून पळविणाऱ्या नेत्यांचा निषेध व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश नवले यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रस्तावित पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग अकोले तालुक्यातील देवठाण येथून जाणार होता.आणि या मार्गाचे प्रस्ताव देखील वरिष्ठ पातळीवर गेले होते . कमी खर्चिक आणि कमी वेळेचा मार्ग म्हणून अकोले तालुक्यातून रेल्वे मार्ग असताना.

काही नेत्यांनी तो लांबवून त्या मार्गाचे आंतर वाढवून त्यावरील खर्च वाढवून भविष्यातील प्रवासाचा खर्च आणि वेळ देखील वाढेल .तसेच अकोल्यातील हा रेल्वे मार्ग बदलल्याने तालुक्याचा विकास देखील खुटणार आहे.याला जबाबदार मार्ग बदलणारे नेते असणार आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश नवले यांनी तीव्र शब्दात केला आहे .

निसर्गरम्य ,बागायती,कृषी उत्पन्नाच्या बाजूने आणि पर्यटणाच्या दृष्टीने भंडारदरा,हरिश्चंद्र गड,ही ठिकाणे अकोले तालुक्यात महत्वाची असून या सर्व बाबीवर प्रशासनाने विचार करावा. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश नवले यांनी प्रशासनास सर्व स्तरावर निवेदने दिली आहे.आणि तसे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!