माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात करोनाचे नियम पाळत कांद्याची चांगली आवक सुरू झाली आहे.
मंगळवारी झालेल्या लिलाव बाजारसाठी 3 हजार 784 कांदा गोण्यांची आवक झाली होती.यावेळी एक नंबरच्या कांद्याला 1 हजार 450 ते 2 हजार 200 रुपये, दोन नंबरला 750 ते 1 हजार 3 50 रुपये, तीन नंबरला 100 ते 650 रुपये तर गोल्टी कांद्याला 300 ते 900 रुपयाचा दर मिळाला.
करोनाच्या संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करीत लिलाव प्रक्रिया होत आहे. परीसरातील कांदा उत्पादक शेतकर्यांना परीसरातील कांदा बाजारच्या तुलनात्मक जादा दर मिळत आसल्याने आपला कांदा विक्रिसाठी अणावा, असे आवाहन
सभापती संगीता शिंदे, उपसभापती नितिन भागडे, संचालक नानासाहेब पवार, विद्याताई दाभाडे, सचिव किशोर काळे, उपबाजार व्यवस्थापक दिनकर पवार यांनी केले आहे.