माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमध्ये लोकांचे राहणीमान मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. अशावेळी विविध संस्था नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहे. बँकेनांही ग्राहकांसाठी काही विशेष सवलती देऊ केल्या आहेत.
दरम्यान आयडीएफसी फर्स्ट बँकेने ग्राहकांसाठी एक अनोखी योजना सुरू केली आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेने आता त्यांच्या ग्राहकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने ‘घर-घर रेशन’ या मोहिमेची सुरुवात केली आहे.
घर-घर रेशन या कार्यक्रमात बँकेच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांना कोव्हिड कस्टमर केअर फंडच्या माध्यमातून त्यांचं योगदान दिलं आहे. बँकेने या उपक्रमाअंतर्गत 50000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना निवडलं आहे जे कोरोनामुळे प्रभावित झाले आहेत. या ग्राहकांना आता रेशन किट दिलं जात आहे.
या रेशन किटमध्ये 10 किलो तांदुळ/पीठ, 2 किलो डाळ, 1 किलो साखर आणि मीठ, 1 किलो खाद्यतेल, मिश्रित मसाल्यांचे 5 पॅकेट्स, चहा आणि बिस्किट्स इ. गोष्टी आहेत. यामध्ये एका छोट्या कुटुंबाला महिनाभराची मदत होईल इतकं सामान आहे.
बँकेकडून दिल्या जाणारं रेशन किट घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या शाखेमध्ये संपर्क करावा लागेल. ग्रामीण भागात रेशन किट कर्मचाऱ्यांच्या मार्फत घरोघरी जाऊन वाटलं जात आहे आणि शहरी भागात कर्मचारी प्रीपेड कार्ड प्रदान करत आहे.