Thursday, August 11, 2022

नितीन गडकरी यांचे नातेवाईक’ असे सांगून बापलेकानं केला धक्कादायक प्रकार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: डोंबिवलीत फसवणुकीप्रकरणी एका बापलेकाला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी लोकांची फसवणूक केली असून लाखो रुपयांचा गंडा लावला आहे. धक्कादायक म्हणजे या दोघांनी आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नातेवाईक आहोत, असं सांगून ही फसवणूक केल्याची माहिती समोर येतेय.

आरोपी वडील राजन गडकरी आणि त्याचा मुलगा आनंद गडकरी यांनी स्वतःची ओळख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नातलग अशी सांगितली. हे दोन्ही आरोपी सरकारी नोकरीत भरती करु आणि स्वस्त दरात सोनं देऊ असं सांगून लोकांकडून पैसे उकळायचे. या सर्व घटना उघडकीस आल्यानंतर दोन्ही आरोपींनी डोंबिवलीतून पळ काढला. मात्र आनंदची पत्नी गीतांजली सोडून दोघंही पसार झाले. हे बापलेक मूळचे कर्नाटकातील आहेत.

हे दोघं पसार झाल्याचं गीतांजलीला माहित नव्हतं. त्यामुळे तिनं या दोघांची बेपत्ता असल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनला गेल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. आनंद आणि गीतांजली यांना चार वर्षांचा मुलगा देखील आहे.

दरम्यान राजन आणि आनंद या दोघांनी माझ्या खात्यातून सर्व आर्थिक व्यवहार केल्याचं गीतांजलीनं पोलिसांना सांगितलं.गीतांजलीनं दिलेल्या जबाबानंतर आणि फसवणुकीला बळी पडणारे तक्रारदार अतुल पाळसमकर यांच्या तक्रारीच्या आधारे स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला.

अखेर दोन पोलिस पथकांनी दोन्ही आरोपींना कर्नाटकातून पकडले असून त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कारवाईखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!