Wednesday, August 17, 2022

नगर वरून औरंगाबादला जाताना संभाजीराजेंचा साधेपणा, ताफा थांबवून शेतात ….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:छत्रपती संभाजीराजे यांनी आज अहमदनगरमधील कोपर्डी इथं जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे हे महाराष्ट्रात दौरा करत आहे. आज त्यांनी अहमदनगरमधील कोपर्डीला भेट दिली.

यावेळी प्रवासाच्या दरम्यान संभाजीराजेंचा साधेपणा पाहण्यास मिळाला. रस्त्याच्या बाजूला थांबून त्यांनी जेवणाचा आनंद घेतला.कोपर्डी इथं जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे औरंगाबादच्या दिशेनं रवाना झाले.  त्यावेळी जेवणासाठी संभाजीराजेंचा ताफा एका  रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका शेतात थांबला.

यावेळी संभाजीराजेंनी शेतामधील औतावर बसून जेवण केलं. त्यांच्यासोबत असलेल्या इतर कार्यकर्त्यांनीही शेतातच जेवण उरकले. यावेळी शेतामधील आवतावर बसून जेवण केल्याने या साधेपणाचे जेवणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
दरम्यान, कोपर्डी अत्याचार झालेल्या पीडित महिलेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आज कोपर्डी आले होते.

या वेळी संभाजीराजेंनी कोपर्डीच्या भगिनी यांना अभिवादन केले आणि पीडित कुटुंबाशी चर्चा केली. या वेळी आपल्याला न्याय मिळाला नाही, अशा भावना पीडित कुटुंबांनी राजे यांच्या समोर मांडल्या होत्या.कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे.

सरकारने या खटल्यासाठी विशेष बेंच स्थापन करून खटला फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि लवकरात लवकर पीडित कुटुंबातील न्याय द्यावा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!