Wednesday, August 17, 2022

सर्वात मोठी बातमी:नगर जिल्ह्यातील या दिग्गज भाजपाच्या नेत्यांनी घेतली अजित पवारांची भेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अहमदनगरचे माजी पालकमंत्री व माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका शुगर (ता. कर्जत) येथे आज दुपारी भेट घेतली.

दरम्यान हा कर्जत जामखेड मतदारसंघ हा आमदार रोहित पवार यांचा आहे.राम शिंदे यांची यावेळी सुमारे अर्धा तास चाललेल्या चर्चेचा तपशील अद्याप मिळाला नसला तरी या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

ही भेट कर्जत -जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्यासाठी चुलते अजित पवार यांनी काही सोईस्कर मार्ग काढण्यासाठी की आणखी काही? राम शिंदे यांना खासदारकीची ऑफर? राम शिंदे ही महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात.

मग त्यांचा काय निरोप घेऊन तर अजित पवारांना भेटले नाहीत ना ? ही भेट म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीची नांदी तर नाही ना ? अशा सर्व चर्चा राजकीय क्षेत्रात चालू आहेत .ही भेट राज्याच्या राजकारणात काही नवीन घडामोडी घडत तर नाही ना असा यावेळी प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!