Thursday, August 11, 2022

अजित पवार एक दिवस आघाडीचं सरकार पाडतील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :आयपीआय (अ)चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वाचं भाष्य केलं. लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राज्यातील सत्तांतरांबद्दलच्या शक्यताही व्यक्त केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची झालेली व्यक्तिगत चर्चा.तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट. यामुळे राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं. या भेटीगाठी होण्यापूर्वी अजित पवार यांनी सरकार पाडणाऱ्यांना आव्हान देणारं केलेलं विधान केले आहे.

महाविकास सरकारी आघाडी सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न रामदास आठवलेंना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले,”मला असं वाटतंय की, या सरकारमध्ये अजिबात ताळमेळ नाही. उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत, त्यांना मुख्यमंत्री बननण्याची संधी मिळाली.

चांगली गोष्ट आहे. एकत्र न येणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन बनवलेलं सरकार आहे. त्यामुळे या तिघांमध्ये अजिबात ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार कधी पडेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे ‘महाविकास आघाडी सरकार गो’ हीच माझी घोषणा आहे,” असं रामदास आठवले म्हणाले.

अजित पवारांविषयी मला आदर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणातही आहेत. आता ते म्हणत आहेत की, ‘कोणीही मायचा लाल सरकार पाडू शकत नाही.’ त्यावर मी असंच म्हणेन की, कोण आहे तो मायचा लाल, मला तर दिसतेय ही अजितदादांची चाल. त्यामुळे एक दिवस अजित पवार हेच सरकार पाडतील.

अजित पवार शपथ घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत गेले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना असं वाटलं होतं की, अनेक आमदार त्यांच्यासोबत आले आहेत. अजित पवारांनीही फडणवीसांसोबत जाताना आमदार बरोबर आहेत की नाही हे बघायला हवं होतं. ते न करताच ते शपथविधीला गेले. पण पु्न्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार

यांचा शपथविधी होऊ शकतो. असा विश्वास मला आहे. पुढे काय होतं ते बघू,” असं मतं रामदास आठवले यांनी मांडलं.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!