Thursday, August 11, 2022

कोरोनामुक्त गाव अभियानात सहभाग घ्या – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील शहरी भागातील कोरोना आटोक्यात येत असून ग्रामीण भागात कोरोना रुग्णवाढ पूर्णपणे रोखण्यासाठी सर्व गावांतील नागरिकांनी पुढाकार घेत राज्य शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्त गाव अभियानात सहभाग

घ्यावा व लवकरात लवकर आपले गाव, तालुका, जिल्हा व राज्य पूर्णपणे कोरोनामुक्त करण्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर आयोजित विविध गावांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की,  कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षीही आणि यावर्षीच्या दुसऱ्या लाटेतही अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. महाराष्ट्राने केलेल्या कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.

माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मी जबाबदार या अभियानांतर्गत गावोगावी नागरिकांची तपासणी झाली. मोठ्या प्रमाणावर तपासणीमुळे रुग्णसंख्या काही काळ वाढलेली दिसली मात्र यातून त्या नागरिकांवर तातडीने उपचार करणे शक्य झाले. यामध्ये नागरिकांचेही मोठे सहकार्य लाभले आहे. कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. त्याला पूर्णपणे घालविण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर काहीशी वाढणारी गर्दी अत्यंत चिंताजनक आहे. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. म्हणून प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करा. नेहमीच मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सींगचे पालन करा व कोणत्याही आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या.

याचबरोबर आपले कुटुंब,आपले गाव पूर्ण कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्त गाव अभियानात प्रत्येक गावांनी सहभाग घ्यावा. यामुळे प्रत्येक गाव कोरोनामुक्त होऊन आपला तालुका कोरोनामुक्त होईल. त्यानंतर जिल्हा, राज्य व आपला देश ही कोरोनामुक्त होईल. या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेताना या अभियानात प्रत्येकाने सक्रिय पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यात व संगमनेर तालुक्यात प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. हे कोरोनाचे संकट आपल्याला पूर्णपणे घालवायचे आहे. यासाठी नागरिकांनी कायम सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्त गाव अभियानामध्ये आपण सक्रीय सहभाग घ्या. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून यामध्ये १७१ गावांपैकी ८१ गावे कोरोनामुक्त झाली असून ३१  गावे लवकरच कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. ही आनंदाची बाब आहे मात्र संपूर्ण तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे असेही ते म्हणाले. यावेळी गावच्या प्रतिनिधींनी गावांतील कोराना उपाययोजनांबाबतची माहिती दिली.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!