Thursday, August 11, 2022

नगर जिल्ह्यातील ९० वर्षांच्या या आजोबांचा थक्क करणारा प्रवास तरुणाला ही लाजवेल असे काम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळने गावातील वय वर्षे ९० असणाऱ्या आजोबांनी हे खरे करून दाखवले आहे.ज्या वयामध्ये लोक घराबाहेर पडत नाहीत त्या वयामध्ये अत्यंत कठोर मेहनत घेत आपल्या काळ्या आईची सेवा करणारे सच्चे आणि हाडाचे 90 वर्षीय शेतकरी नाना गोलवड व भिमाबाई जीवापाड मेहनत घेत आहेत.

या वयातही आपल्या शेतीवर असलेले प्रेम आणि त्यातून आपल्या मेहनतीने व स्वकर्तुत्वाने फुलवला जाणार मळा सर्वांनाच आकर्षित करून जातो. शेती हेच त्यांचे जीवन चरितार्थाचे साधन आहे.अतिशय कष्टाने आणि नियोजन करून त्यांनी आपली शेती फुलवली आहे. त्यांचा मळा , त्यांचे नियोजन हे खरोखर पाहण्यासारखे आहे. सेंद्रिय शेती करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे.

रासायनिक खते आणि औषधे यांचा ते बिलकुल वापर करत नाही. आपल्या शेतावर विविध प्रकारच्या पिकांची ते लागवड करतात.त्यामध्ये भात, नागली, वरई, तूर, मूग, उडीद, भुईमूग, लागवड गवार, भेंडी, काकडी, कारली, घोसाळी, दोडका, लाल भोपळा, दुधी भोपळा, अंबाडी, कारली, खुरसनी, खरबूज अशा नानाविध पिकांची ते लागवड करत असतात.

त्यांनी अत्यंत मेहनतीने उभी केलेले विविध पीक लागवड पद्धतीची शेती, शेतकरी वर्गाला नवी दिशा देणारी ठरली आहे. कष्टाने व श्रद्धेने आपण करत असलेले काम पुढे नेले पाहिजे हाच संदेश या जोडीकडून सर्वांसाठी आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!