Wednesday, August 17, 2022

महाराष्ट्रातील त्या शेतकऱ्यांना एवढ्यात कर्जमाफीचा लाभ नाही’

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यातील शेतकऱ्यांना महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर करत शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली.

मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना या शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अशातच जे शेतकरी या कर्जमाफी योजनेत पात्र आहेत, अशा उर्वरित शेतकऱ्यांना ही कर्जमाफी एवढ्यातच मिळणार नसल्याचं धक्कादायक विधान डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाण्यात केलं आहे.त्यामुळे एका प्रकारे राज्य सरकार 3 लाख रुपयांपर्यंत का होईना मात्र संपूर्ण शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात अपयशी ठरल्याची कबुलीच मंत्री शिंगणे यांनी दिली आहे.

शिवाय यापुढे शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईलच या आशेवरही राहू नये, असा सल्ला देखिल शेतकऱ्यांना दिला आहे. कोरोनामुळे गेली दीड वर्ष राज्य सरकारच्या तिजोरीवर टंचाई निर्माण झाली असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी यापुढे कर्जमाफीच्या भरवशावर राहू नये, असं शिंगणे यांनी सांगितलं.शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच मान्यता दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!