Thursday, August 11, 2022

माजी सरपंच हत्येप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाणचे तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर हत्याकांडातील सूत्रधार माजी सरपंच राजाराम शेळके याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना पारनेर न्यायालयाने 9 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी दिले.

प्रकाश कांडेकर यांच्या हत्येचा कट केल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा भोगत असलेल्या राजाराम शेळके व त्याचा मुलगा राहुल वर्षभरापूर्वी पॅरोलवर सुटले होते. शेळके शुक्रवारी शेतामधील काम करून घराकडे निघाला होता. तेवढ्यात अज्ञात मारेकर्‍यांनी धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

शेळकेचा मुलगा राहुल याने सुपे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगव्हाणचा उपसरपंच राजेश शेळके, प्रकाश कांडेकर यांचा भाऊ सूर्यभान कांडेकर, मुलगा संग्राम कांडेकर व अनिकेत कांडेकर यांच्यासह गणेश भानुदास शेळके, भूषण प्रकाश कांडेकर, सौरभ इंद्रभान कांडेकर, अक्षय पोपट कांडेकर यांच्याविरोधात

कट करून शेळकेची हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सुपे पोलिसांनी राजेश शेळके, सूर्यभान कांडेकर, संग्राम कांडेकर व अनिकेत कांडेकर यांना रात्रीच अटक केली. उर्वरित आरोपी पसार आहेत. चारही आरोपींना शुक्रवारी सकाळी पारनेरच्या न्यायालयापुढे उभे केले असता तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी आरोपींना पोलीस कोठडीची मागणी केली.

हत्येचा कट कोठे रचला? त्यासाठी कोणाला सुपारी दिली होती? गुन्ह्यात वापरलेले हत्यार ताब्यात घ्यायचे आहे, कटाविषयी चौकशी करायची आहे, इतर आरोपींना अटक करायची आहे. त्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी गोकावे यांनी केली.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!