Wednesday, August 17, 2022

नगर ब्रेकींग:जवळच्या नातेवाईकांनी केला महिलेवर बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवाशी महिला (वय-२४) त्याच हद्दीतील गोदावरी नदीकाठी धुणे धुण्यासाठी गेली असता तिच्यावर वाकडी नजर असलेल्या तिचाच त्याच गावातील रहिवाशी

असलेल्या जवळच्या नातेवाईक आरोपीने तिला जवळच्या काटवनात हात धरून घेऊन जाऊन बलात्कार केला असल्याची फिर्याद या महिलेने तब्बल पंधरा दिवसांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान हि घटना या महिलेच्या पतीला उशिराने समजली असता त्याने हि बाब आपल्या पत्नीला धाक धपटशा करून विचारली असता उघडकीस आल्याचे समजते त्यानंतर पतीने हा गुन्हा जवळच्या नातेवाईकावर दाखल केला असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.आरोपी हा या फिर्यादी महिलेचा सख्खा मेहुणा असल्याचे समजते.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,सुरेगाव येथील विविहित महिला हि सुरेगाव येथे आपले सासू, सासरे,दीर,दोन लहान मुले असे एकत्र रहातात.हि महिला मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालवते.तिच्या घराच्या जवळच तिची एक बहीण व मेहुणे राहतात.दि.१४ मे रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेच्या सुमारास गेली असता ती धुणे धुण्यासाठी सुरेगाव हद्दीत गोदावरी नदीकाठी

गेली तिच्यावर वाकडी नजर ठेऊन असलेला तिचा त्याच गावातील मेहुणा हा तिच्या पाठलागावर गेला होता व त्याने आजूबाजूला कोणी नाही हि संधी साधत तिचा हात धरून दिला शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करू लागला.तिने त्यास नकार दिला असता त्याने तिला दमदाटी देऊन मारहाण करत बळजबरीने काटवनात ओढत नेले व तीच्यावर अतिप्रसंग केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.तिने आरडाओरडा केला

असता त्या ठिकाणी कोणीही नसल्याने त्याचा उपयोग झाला नाही.याबाबत संबंधित महिला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आली होती मात्र तिचा चुलत सासरा यांनी बेइज्जती होईल या भीतीने दूरध्वनीवरून,” तक्रार देऊ नका घरी जा” असे सांगितल्याने हि तक्रार झाली नव्हती.दरम्यान मात्र त्यांनी तक्रारी अर्ज दिला होता त्यावरून पोलिसानी चौकशी कामी

बोलावल्यावर हा प्रकार उघड झाला आहे.दरम्यान या घटनेची गंभीर दाखल शिर्डी पोलीस विभागीय अधिकारी संजय सातव यांनी घेतली असून घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.दरम्यान हि घटना या महिलेच्या पतीला उशिराने समजली असता त्याने हि बाब आपल्या पत्नीला धाक धपटशा करून विचारली असता उघडकीस आल्याचे समजते त्यानंतर पतीने

हा गुन्हा जवळच्या नातेवाईकावर दाखल केला असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.हा आरोपी हा फिर्यादी महिलेचा सख्खा मेहुणा असल्याचे समजते.या प्रकरणी फिर्यादी महिलेने आज कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.क्रं.२१३/२०२१ भा.द.वि.कलम ३७६,३५४,३२३,५०६ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!