Wednesday, August 17, 2022

नदीवरच महिलेवर अतिप्रसंग नगर जिल्ह्यातील या गावात घडला प्रकार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे या घटनेमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहेत .

अशीच एक घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे एक तरुणी महिला नदीवर धुणे धुण्यासाठी गेली असता ती एकटी असल्याचा फायदा घेत विजय चंदू जिरे याने तिच्यावर दमदाटी करत छेडछाड केली तसेच तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी आरोपीविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत महिलेने फिर्याद दाखल केली असून फिर्यादीनुसार १४ मे रोजी गोदावरी नदी तीरावर धुणे धुण्यासाठी गेले असता एकटीला पाहून विजय जरे याने फिर्यादी महिलेअस दमदाटी करून बळजबरीने फिर्यादीचा हात धरून काटवनात नेले.

त्याठिकाणी मारहाण करून तिच्यावर अतिप्रसंग केला. याप्रकरणी आरोपी विजय झरे याच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सुरेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड अधिक तपास करीत आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!