Thursday, August 11, 2022

अजित पवार सोबत गुप्त बैठक झाली का? राम शिंदेंचा मोठा खुलासा म्हणाले..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज टिम:उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते राम शिंदे यांची शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. मात्र, राम शिंदे यांनी ही फक्त अफवा असल्याचं सांगितलं आहे.

भाजपचे नेत्यांनी पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरू केली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्या गुप्त भेटीमुळे एकच खळबळ उडाला.शनिवारी दुपारी कर्जतमधील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार आणि राम शिंदे यांची बंद दाराआड अर्धा

तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अशी कोणतीही चर्चा झालीच नसल्याचा दावा राम शिंदे यांनी केला आहे.कर्जत जामखेड मतदार संघात माजी मंत्री भाजपचे नेते राम शिंदे यांचा पराभव करून अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार हे आमदार झाले आहेत. त्यामुळे शिंदे आणि पवार यांची भेट झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

पवार शनिवारी अंबालिका साखर कारखान्यावर आले होते आणि राम शिंदे हे देखील आपल्या मतदारसंघात होते. यावेळी ही भेट झाल्याचे बोलले जात होते, पण अशी कोणतीच भेट झाली नसल्याचे सांगून राम शिंदे यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!