माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात जिओने जिओ पोस्टपेड प्लस सेवा सुरू केली होती, त्यामध्ये कंपनीने प्रत्येक किंमतीच्या सेक्शनसाठी प्लान्स सादर केले होते. हे प्लान्स ३९९ रुपयांपासून सुरू होतात.
सर्वाधिक किंमतीच्या पोस्टपेड प्लान ची किंमत १,४९९ रुपये आहे. आज आम्ही तुम्हाला जिओच्या ५९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लान्सबद्दल विस्तृत माहिती देत आहे.रिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा प्लान हा एक कौटुंबिक पोस्टपेड प्लान आहे. यात एकूण १०० जीबी डेटा उपलब्ध आहे.
हा डेटा संपल्यानंतर ग्राहक प्रति जीबी १० रुपये दराने इंटरनेट वापरू शकतात. प्लानमध्ये डेटा रोलओव्हर सुविधा २०० जीबी आहे. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास एका बिलाच्या सायकलसाठी ५९९ रुपये द्यावे लागतील.
जिओच्या या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण २ सिमकार्ड मिळतात. म्हणजेच, दोन व्यक्तींचे टेलिफोन बिल ५९९ रुपये. जिओ पोस्टपेड प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल देखील उपलब्ध आहेत. यात दररोज १०० एसएमएस दिले जातात. जिओच्या या
प्लानमध्ये नेटफ्लिक्स, Amazon, प्राइम, डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी, जियोटीव्ही, जिओसिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊड अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन मिळते. तर जिओच्या हा प्लान घेण्यासाठी कंपनी जियो प्राइमसाठी ९९ रुपये घेते.