Thursday, August 11, 2022

भारताला पाणीदार बनविण्यासाठी जनसमुदायाने चालविलेल्या विकेंद्रित जलव्यवस्थापनाची गरज-जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर/सुखदेव फुलारी

भारतातील 17 राज्य व 365 जिल्हे पाणीटंचाई व दुष्काळाचा तर 190 जिल्हे पूरक्षेत्र परिस्थितीचा सामना करत आहेत असून जमिनीखालील जलधर (Aquifer) 72 टक्के अतिशोषित (Over Draft) आहे.भारताला पाणीदार बनवायचे असेल तर जनसमुदायाने  चालविलेल्या विकेंद्रित जल व्यवस्थापनाची (Community Driven Decentralized Water Management) चळवळ उभारली पाहिजे असा सल्ला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांनी दिला.

अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी अभियांत्रिकी महाविद्यालय,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि उन्नत भारत अभियान यांचे पुढाकाराने आयोजित “ज्ञानाचे प्रतीक” (Symbol of knowledge) या ऑनलाईन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह बोलत होते. अखिल भारतीय शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव छत्रपती मालोजीराजे भोसले, डॉ.सुमंत पांडे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.प्रभाकर देसाई,सहसचिव,श्री.शिंदे, प्राचार्य डी. एस.डॉ.बोरमणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ.एन. एस.शेजवळ व सुमारे 900 विद्यार्थी यावेळी ऑनलाइन उपस्थित होते.

डॉ.राजेंद्र सिंग पुढे म्हणाले,भारतीय संस्कृती पासून प्रकृती वेगळी झाल्याने आपल्या भविष्यावर संकटे येत आहेत. परंतु संकटांना भिऊन आपण स्वस्थ राहू शकत नाही तर प्रकृती व पर्यावरणाचे रक्षण करत पुढे जायचे आहे.पंचमहाभूत आपल्याला बनविणारे आणि चालविणारे पाच घटक आहेत.हेच आपले नारायण व भगवान आहे. आपले आरोग्य,अन्न व पाणी नदीशी जोडलेले आहे.वाहत्या नद्या आणि शरीरातील रक्त वाहिन्या सारख्या आहेत. त्यांची काळजी घेऊन नद्यांचे होणारे प्रदूषण रोखले पाहिजे.
आस्था ,पर्यावरण, संस्कृती जेव्हा हळू हळू अस्ताला जाते त्यावेळी सगळ्यात जास्त हानी पर्यावरणाची हानी होते.आज देशातील नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्या आहेत, अतिक्रमण हे एक दुसरे मोठे अरिष्ट आहे. हे शतक खूप आव्हानाचे आहे,तथापि हतबल न होता जलसाक्षर होणे हाच यावरील उपाय आहे.जेंव्हा जनसमुदयाव्दारे विकेंद्रित जल व्यवस्थापन होते तेंव्हा गावे पाणीदार होऊन दुष्काळ,पूर मुक्त होतात.
आजचे आपले आधुनिक शिक्षण मुलांना निर्सगाकडून जास्तीत जास्त घेण्याचे व प्रकृतीचे पोषण करण्या ऐवजी शोषण करण्याचे शिक्षण देत आहेत,तथापि निसर्ग आणि मानवतेचे पोषण करणारे शिक्षणाची आज नितांत गरज आहे.
भारताला पाणीदार बनविण्यासाठी सायन्स, इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी या तीन विभागांनी एकत्रितपणाने काम करण्याची गरज आहे. पाणी म्हणजे हवामान आणि हवामान म्हणजे पाणी (Warer is Climate and Climate is Water) हे घोषवाक्य घेऊन वाटचाल करण्याची गरज आहे.युवकांनी स्थानिक समस्या समजून घेऊन त्याचा अभ्यास करावा आणि कृतिशील राहावे असे आवाहन ही डॉ.राजेंद्र सिंह यांनी केले.
निशा भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!