Wednesday, August 17, 2022

या’ तीन बँकाच्या ग्राहकांसाठी खुशखबर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तब्बल 9 वर्षांनंतर एटीएम व्यवहारसंदर्भातील नियमावलीत बदल करण्यास परवानगी दिली आहे. आरबीआयने सर्व बँकांना एटीएम व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्क वाढविण्यास परवानगी दिली.

भारतातील बहुतेक खासगी आणि सरकारी बँका शहरांमध्ये 3 ते 5 विनामूल्य एटीएम व्यवहारास परवानगी देतात. तर, ग्रामीण भागात बँका जास्तीत जास्त 5 विनामूल्य एटीएम व्यवहारास परवानगी देतात. मात्र ही मर्यादा ओलांडल्यानंतर कोणतीही बँक एटीएम व्यवहार चालू ठेवण्यासाठी शुल्क आकारतात.

मात्र अद्याप अशा काही बँका आहेत, ज्या ग्राहकांना अनलिमिटेड विनामूल्य एटीएम व्यवहार करण्याची सुविधा देतात.देशातील तीन खासगी बँका आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड फ्री एटीएम व्यवहारांची ऑफर देत आहेत. यात इंडसइंड बँक , आयडीबीआय बँक आणि सिटी बँक या तीन बँकांचा समावेश आहे.सिटी बँक सध्या भारतात आपला व्यवसाय वाढवित आहे.

त्यामुळे अनलिमिटेड फ्री एटीएम व्यवहारांची ऑफर दिली जात आहे. तर आयडीबीआय बँक आणि इंडसइंड बँक आपल्या ग्राहकांना देशभरात विनामूल्य अमर्यादित एटीएम व्यवहारांची ऑफर देतात.

मिळालेल्या माहितीनुसार, जर तुम्ही आयडीबीआय ग्राहक असाल किंवा तुम्ही त्या बँकेत खाते उघडण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ही बँक स्वत:च्या एटीएमवर फ्री अनलिमिटेड व्यवहार करण्याची ऑफर देत आहे. तर इतर बँकांच्या एटीएमवर केवळ 5 मर्यादित व्यवहार करण्याची परवानगी देत आहे.

तर इंडसइंड बँक भारतातील कोणत्याही बँकेच्या एटीएमवर फ्री अनलिमिटेड एटीएम व्यवहार करण्याची संधी देते. बँकेच्या वेबसाईटनुसार, आपण भारतातील कोणत्याही एटीएमवर इंडसइंड बँक डेबिट कार्डद्वारे अनलिमिटेड फ्री एटीएम पैसे काढू शकता.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!