माय महाराष्ट्र न्यूज टिम:जयपूरच्या एका व्यापाऱ्याने शामनगर पोलीस ठाण्यात प्रियंका चौधरीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित व्यापाऱ्याने जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांच्याकडे आपली व्यथा मांडली आहे. मिसेस राजस्थान प्रियंका चौधरीच्या मोहात पडून आपण लाखो रुपये
गमावल्याचं त्याने पोलिसांना सांगितले. मिसेस राजस्थानने आपल्याला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. नंतर नकळत अश्लील व्हिडीओ बनवला. त्यानंतर तो व्हिडीओ लीक करण्याची धमकी देऊन लाखो रुपये घेतले. तसेच आता कोट्यवधींची जमीन आणि 1 कोटींची रक्कम आरोपी महिला मागत असल्याची माहिती पीडित व्यापाऱ्याने पोलिसांना दिली.
चौधरी आणि पीडित व्यापाऱ्याची 2016 साली पहिल्यांदा ओळख झाली होती. तेव्हा ती पतीसोबत पीडितेच्या घरी गेली होती. व्यापाऱ्याच्या शेजारच्या गावाची असल्याचं सांगून प्रियंका चौधरीने त्याच्याकडून घर भाड्याने मागितलं. पीडित व्यापाऱ्याने भोळ्यामनाने आपला एक फ्लॅट प्रियंका चौधरीला भाड्याने दिला. त्यानंतर प्रियंका चौधरी आणि उद्योगपती यांच्यातील जवळीक वाढत गेली.
प्रियंकाला जेव्हा व्यापाऱ्याच्या व्यवसायाविषयी माहित पडलं तेव्हा ती त्याच्याकडून जास्त पैशांची मागणी करु लागली. तिने व्यापाऱ्याकडून लाखो रुपये घेतले. तसेत लाखो रुपयांचे दागिने देखील घेतले.
महिलेची व्यापाऱ्यापुढे मोठी अट
महिलेची अवाजव मागणीला कंटाळून पीडित व्यापारी जेव्हा नाही म्हटला तेव्हा तिने अश्लील व्हिडीओची धमकी दिली. तसेच तिचा पती टोंक येथे हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. त्यामुळे त्याला सांगून व्यापाऱ्यावर गंभीर कारवाई करेल, अशी धमकी महिला व्यापाऱ्याला देऊ लागली. व्यापाऱ्याला
या सगळ्यांपासून सुटका मिळवायची असेल तर त्याने एक कोटी रुपये रोख रक्कम आणि एक कोट्यवधींचा प्लॉट नावावर करावा, अशी अट तिने ठेवली होती. तिच्या या अवाजव मागणीला कंटाळून अखेर व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांकडून मिसेस राजस्थानला बेड्या
व्यापारी जयपूरच्या शामनगर पोलीस ठाण्यात गेला. त्याने आपली संपूर्ण बाजू पोलिसांना सांगितली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई केली. पोलिसांनी आरोपी प्रियंका चौधरी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंनतर तातडीने शनिवारी (12 जून) सकाळी अटक केली.