Thursday, August 11, 2022

आधार लिंक नसल्यामुळे लाखो कामगारांचे भविष्य निर्वाह निधी खाते बंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर/सुखदेव फुलारी

भविष्य निर्वाह निधी खात्याला आधार कार्ड (केवायसी) लिंक न केल्यामुळे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने जून 2021 पासून नगर जिल्ह्यातील हजारो कामगारांसह देशातील लाखो कामगारांचे भविष्य निर्वाह निधी खाते बंद केले आहे.केंद्र सरकारने या बाबतीत सुधारित अध्यादेश काढून कामगारांना दिलासा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन चे अध्यक्ष अविनाश आदिक व सरचिटणीस नितीन पवार यांनी केली आहे.

देशात भविष्य निर्वाह निधीचे 6 कोटी ग्राहक ग्राहक(सभासद) आहेत.या कार्यालयाने पीएफ खात्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) आधार कार्डशी जोडणे आवश्यक केले आहे. यासाठी ईपीएफओने सामाजिक सुरक्षा कोड 2020 च्या कलम 142 मध्ये बदल केले आहेत. यामुळे इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न (ईसीआर) फाइलिंग प्रोटोकॉल बदलला आहे.

ईपीएफओने आपल्या नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की 1 जून 2021 नंतर नियोक्ताने ज्या कर्मचार्‍याचा यूएएन आधारशी जोडला जाईल त्याच कर्मचार्‍याचा ईसीआर फाईल दाखल करु शकतील.ज्यांचे आधार अपडेटेड केलेले नाहीत, त्यांचे ईसीआर स्वतंत्रपणे भरले जातील. नंतर तो कर्मचार्‍याच्या यूएएनला आधारशी जोडू शकतो. पण प्रत्येकाने हे शक्य तितक्या लवकर करावे.

मात्र भविष्य निर्वाह निधी (EPFO) कार्यालयाने नव्याने सदस्यांची केवायसी (KYC) बाबतीत केलेल्या नियमावलीमुळे ज्या कामगारांनी आपले आधार कार्ड भविष्य निर्वाह निधी खात्याशी लिंक केलेले नाही अशा लाखो कामगारांचे खाते जून 2021 पासून बंद होवुन व्यवस्थापनाला अंशदान रक्कम जमा करता येत नाही.सोशल सिक्युरिटी कोड पुर्णपणे अंमलात न आणता भारत सरकारने कलम 142 अन्वये काढलेल्या अधिसूचना नुसार भविष्य निर्वाह निधीचा तपशील आधार कार्डाशी जुळत नसेल त्यांचे भविष्य निर्वाह निधी अंशदान रक्कम  स्विकारली जात नाही.

यामुळे लाखो कामगारांना विनाकारण त्रास होत आहे.1980 पुर्वीच्या  कामगारांकडे जन्म दाखले नाहीत, शाळा सोडल्याचा दाखला ऊपलब्ध नसल्याने वयाच्या पुरावा सादर करता येत नाही,महिला कामगारांचे लग्नाच्या अगोदरचे नाव बदलण्याकरिता विवाह प्रमाणपत्रची मागणी केली जाते. जुन्या महिला कामगारां कडे विवाह प्रमाणपत्र नसेल  तर खाते बंद होते.नाव बदलण्या करिता गॅजेट मधील बदल स्विकारले जात नाही.अशिक्षीत कामगारांना कडे वयाच्या कोणताही पुरावा नाही. 1996 पुर्वी अनेक व्यवस्थापन अंदाजे वय भविष्य निर्वाह निधी करिता दिले जात होते त्यामुळे सदरील वय आधार कार्ड ला जुळत नाही. केवायसी (KYC) करिता आधार कार्ड, मोबाईल नंबर, बॅंकेचा सविस्तर विवरण, पॅन कार्ड ची  गरज असते पण या मधील तपशील योग्य पध्दतीने जुळला नाही तर के वाय सी नाही म्हणून सदस्यांची खाते बंद होते. नावाच्या बदल, वय , इतर तपशील बाबतीत व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र 30 एप्रिल 2021पुर्वी स्विकारले जात होते व सदस्यांना रक्कम मिळत होती.  भविष्य निर्वाह निधी अंशदान रक्कम  प्रत्येक महिन्यात 15 तारखे पुर्वी  जमा करणे कायद्याने आवश्यक आहे. परंतु शासनच्या आदेशमुळे लाखो कामगारांच्या अंशदान रक्कम जमा होणार नाही. जून 2021 पासून खाते बंद होऊन अंशदान रक्कम स्वीकारली जात नसल्याने कामगारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. खाते बंद झालेल्यांमध्ये नगर जिल्ह्यातील साखर उद्योग व इतर क्षेत्रातील हजारो कामगारांचा समावेश आहे.केंद्र सरकारने या बाबतीत सुधारित अध्यादेश काढून कामगारांना दिलासा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन चे अध्यक्ष अविनाश आदिक व सरचिटणीस नितीन पवार यांनी केली आहे.

 

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!