Thursday, August 11, 2022

राज्यात कोरोनाचे २४ तासात इतके रुगण तर मृत्यू…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज :राज्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार,

गेल्या २४ तासांत ७ हजार ५०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.४४ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण १० हजार ४४२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत १० हजार ४४२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ४८३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ७ हजार ५०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ३९ हजार २७१ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.८८ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख ५५ हजार ०४१ आहे.

दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ८० लाख ४६ हजार ५९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ लाख ०८ हजार ९९२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ९ लाख ६२ हजार १३४ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ६ हजार १६० जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!