Thursday, August 11, 2022

महाराष्ट्रातील ‘हा’ पहिला जिल्हा कोरोनामुक्त?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंधही शिथिल केले आहेत. याच दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे राज्यातील एक जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याची.

होय, कारण या जिल्ह्यात आता सक्रिय रुग्ण  संख्या ही शून्य झाली असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, आता यासंदर्भात आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.महाराष्ट्रातील कोरोना बाधित आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकार दररोज आकडेवारी जाहीर करत असते.

आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय रुग्ण संख्या ही शून्य  झाली आहे. मात्र, आज जिल्ह्यात नव्याने 69 रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांची नोंद सक्रिय रुग्णसंख्येत झालेली नाहीये तांत्रिक तृटीमुळे हा घोळ झाला असल्याची माहिती डॉ. प्रदीप आवटे यांनी न्यूज18 लोकमतच्या डिजिटलला दिली. सध्या स्थितीत आता बुलडाणा जिल्ह्यात 69 सक्रिय रुग्ण आहेत.

आकडेवारीनुसार, बुलडाणा जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 82,101 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला होता त्यापैकी 81461 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 635 रुग्णांचा कोरोनामुळे तर पाच जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आज एकूण 7504 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 56,39,271 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.44 टक्के इतके आहे. आज राज्यात 10,442 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आज 483 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 284 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 199 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!