Thursday, August 11, 2022

नगर जिल्ह्यातील संतापजनक घटना :अल्पवयीन मुलीवर एक वर्षापासून लैंगिक अत्याचार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संकटात आणि संकटातून बाहेर पडताना ही महिला वरील अत्याचार मध्ये मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहेत.अशीच एक धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर

वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. याबाबत आरोपीविरुद्ध शनिवारी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.राजेंद्र नामदेव कांदळकर रा. जोर्वेकर वस्ती तळेगाव दिघे असे या आरोपीचे नाव आहे.

राजेंद्र कांदळकर याने १६ वर्ष ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीवर एक वर्षापासून वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला यातून पिडीत मुलगी सहा महिन्याची गरोदर राहिली. पिडीत मुलीचे आई वडील शेळी चारण्यासाठी बाहेरगावी गेले असता आरोपी राजेंद्र कांदळकर याने हे मुलीच्या इच्चेविरुद्ध ह्या अत्याचाराचे कृत्य केले.

कोणाला काही सांगू नको अशी धमकी देण्यात आली. अत्याचारातून पिडीत मुलगी गरोदर राहिल्याने आई वडिलांसमवेत पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांसह गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस उप निरीक्षक आर.एस. सानप हे करीत आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!