माय महाराष्ट्र न्यूज: यंदा कापसाचे उत्पादन घटल्याने फेब्रुवारी या महिन्यात कापसाची निर्यात गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु महाराष्ट्रातील अनेक
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. अशात कापसाचे देशांतर्गत उत्पादन घटले असले तरी निर्यातीला अनुकूल स्थिती असल्याने उत्पादकांना लाभ होणार असल्याचे बोलले जाते.
देशातील व्यापाऱ्यांनी आशियातील प्रमुख खरेदीदारांसोबत कापसाच्या तब्बल ४ लाख गाठींच्या खरेदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. फेब्रुवारी या एका महिन्यात व्यापाऱ्यांनी चीन,
बांगलादेश, व्हिएतनाम या आशियाई देशांसोबत ४ लाख कापसाच्या गाठी (६८ हजार मेट्रिक टन) निर्यातीसाठी करार केले आहेत. यामुळे यंदा कापसाला चांगला भाव मिळेल असे बोलले जात आहे.
यंदाच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताकडून २० लाख गाठींची निर्यात होण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्याने देशातून अंदाजे १४ लाख गाठींची निर्यात होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
काही व्यापाऱ्यांच्या मते निर्यात २५ लाख गाठींहून अधिक होऊ शकते.जगभरातील बाजारांमध्ये कापसाची वाढलेली मागणी आणि वाढलेली निर्यातक्षमता याचा लाभ देशाला मिळण्याची शक्यता आहे.
पण दुसरीकडे कापसाचे स्थानिक उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने निर्यातीवर दबाव येऊ शकतो. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार, २०२३-२४ या वर्षात भारतातील कापसाचे
उत्पादन ७.७ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. २००७-०८ नंतर कापूस उत्पादनाचा हा नीचांक आहे.प्रमुख निर्यातदारांच्या तुलनेत भारतीय कापूस स्वस्त आहे. प्रमुख निर्यातदारांमध्ये
अमेरिका आणि ब्राझील या देशांचा समावेश आहे. या दोन्ही देशांशी भारताचे सलोख्याचे संबंध आहेत. यामुळे कापूस निर्यातीला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजेच अमेरिकेच्या
वायदे बाजारात कापसाचे भाव ८० सेंटवरून ९४ सेटपर्यंत पोचले आहेत. म्हणजेच १४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलवरून रुईचा भाव १७ हजार २०० रुपयांपर्यंत पोचला. याचाच अर्थ असा की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे
भाव एकाच महिन्यात तब्बल १६ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यानंतर देशातील वायदेही वाढले आहेत. पण त्याप्रमाणात प्रत्यक्ष कापूस खरेदीचे भाव वाढले नाहीत.