Wednesday, August 17, 2022

 आ.कानडे यांच्या विजयासाठी आम्ही जिवाचे रान केले मात्र हेच आमदार …

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालय विस्तारित इमारत बांधकामाचे भुमिपूजन तसेच हरेगाव ते नाऊर या राज्यमार्ग क्रमांक 50 च्या तीन कोटी 57 लाख रुपये खर्चाच्या दुरूस्ती कामाचा भुमिपूजन समारंभास ससाणे गटातील प्रमुख नेते उपस्थित नसल्याने ना. थोरात यांनी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह प्रमुख नेत्यांकडे विचारणा केली.

त्यावेळी त्यांनी आम्हाला तुमच्याशी बोलायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार ना. थोरात यांनी ससाणे समर्थकांना काल संगमनेर भेटीची वेळ दिली होती. मात्र अचानक दुसरे काम निघाल्याने ना. थोरात यांना तिकडे जावे लागल्याने त्यांनी आ. डॉ. सुधीर तांबे यांच्यावर ही जबाबदारी सोपविली.

दरम्यान श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार आ. लहू कानडे यांच्या विजयासाठी आम्ही जिवाचे रान केले, मात्र आता हेच आमदार आम्हाला विश्वासात न घेता परस्पर कार्यक्रम ठरवितात.

परिणामी निष्ठावान कार्यकर्त्यांना निरोप न गेल्यास आम्हाला कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची कैफियत ससाणे गटाच्या प्रमुख नेत्यांनी काल संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मांडली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेत असलेली खदखद चव्हाट्यावर आली .

श्रीरामपूरहून गेलेल्या ससाणे गटातील प्रमुख चार जणांच्या शिष्टमंडळाने आ. डॉ. सुधीर तांबे यांच्यापुढे आपली सविस्तर कैफियत मांडली. कोणतेही कार्यक्रम ठरविताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची वेळ ठरवूनही आमच्याशी चर्चा न करता अचानक रात्री

8.30 वाजता भ्रमणध्वनीवरून निरोप देऊन उद्या सकाळी दोन कार्यक्रम ठरल्याचे कळविले. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांपर्यंत निरोप देता आले नाही. परिणामी या कार्यकर्त्यांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागले. असे प्रकार वारंवार घडत आहेत.पक्षातील तीन-चार जणांना सोबत घेऊन आमदार कार्यालयाचा कारभार सुरु आहे.

शासकीय काम अथवा घरकुल लाभासाठी सामान्य कार्यकर्त्यास साधे पत्रही लवकर मिळत नाही, अशा अनेक तक्रारी ससाणे गटाने यावेळी केल्या.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!