Wednesday, August 17, 2022

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो दूध दरासाठी १७ जूनला आंदोलन यांनी दिली हाक…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध संघांनी दुधाचे भाव पाडल्याचा आरोप करीत दूध उत्पादकांनी आंदोलन पुकारले आहे.

यासाठी १७ जून रोजी राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांवर मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.

आंदोलने झाले सुरू
कडक निर्बंध शिथील झाल्यानंतर आता पुन्हा आंदोलने सुरू झाली आहेत. त्यात शेतकरी आंदोलनाचीही भर पडणार आहे. डॉ. अजित नवले यांनी याबाबत माहिती दिली आहे.

डॉ.नवले म्हणाले
‘लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर दहा ते पंधरा रुपये प्रती लिटरने कमी केले. ग्राहकांसाठीचे विक्रीदर मात्र तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केली आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!