Wednesday, August 17, 2022

या ठिकाणी आढळला महिलेचा मृतदेह;हा केला जातो संशय व्यक्त

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज :नगर-औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर परिसरात सुनील पांडुरंग टीमकरे यांच्या शेतामध्ये विहीर आहे. टीमकरे हे आज सकाळी आपल्या शेतात मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना तेथे दुर्गंधी आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता पाण्यात तरंगताना महिलेचा मृतदेह दिसला.

त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांशी संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र या महिलेची ओळख पटली नसून घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून सदर मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे. महिलेची ओळख पटली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!