Wednesday, August 17, 2022

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेवासा, राहुरी, शिर्डी, कोपरगाव ,श्रीरामपूर मधून या नावाची चर्चा ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला दिले असल्याने संस्थांनच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असून अनेकांची नावे समोर आली असून उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळणार असल्याचे समजते.

सन २०१४ साली राज्यात भाजप- सेनेची सत्ता आल्यानंतर साई संस्थानवर भाजप आणि सेनेच्या नेत्यांची वर्णी लागली. यावेळी संस्थानचे अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष पदावर भाजपची वर्णी लागल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान २२ जून पर्यंत उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला नवीन विश्वस्त नेमण्या संदर्भात आदेश दिल्याने सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात खलबते सुरू झाली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी आ.रोहित पवार, आ.आशुतोष काळे, आ.निलेश लंके यांची नावे आघाडीवर आहेत. तर काँग्रेसकडून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आ.सुधीर तांबे व भाचे सत्यजीत तांबे यांची नावे चर्चेत आहेत.तर शिर्डी संस्थानचे उपाध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार असून रवींद्र मिर्लेकर यांचे जवळपास निश्चित आहे .

विश्वस्त पदासाठी जिल्ह्यातील शिर्डी, कोपरगाव, कोपरगाव, संगमनेर येथील सेना पदाधिकारी यांना संधी दिली जाणार असून त्यादृष्टीने सेनेच्या वरीष्ठ पातळीवरून चाचपणी सुरू आहे.

विश्वस्त पदासाठी यांची नाव चर्चेत ?

माजी आमदार पांडुरंग अभंग व प्रशांत गडाख(नेवासा),रावसाहेब खेवरे(राहूरी), राजेंद्र फाळके(कर्जत), राजेंद्र झावरे(कोपरगाव), करण ससाणे(श्रीरामपूर),चेतन लोखंडे(श्रीरामपूर), हेमंत ओगले(श्रीरामपूर), किरण काळे(नगर), सुरेश वाबळे(राहूरी), शशिकांत गाडे(नगर), कमलाकर कोते(शिर्डी), राजेंद्र पठारे(राहाता),

सचिन कोते(शिर्डी), सुधाकर शिंदे(शिर्डी),रमेश गोंदकर(शिर्डी), महेंद्र शेळके(शिर्डी), डॉ.एकनाथ गोंदकर(शिर्डी), संग्राम कोते(शिर्डी), अनिता जगताप( शिर्डी), निलेश कोते(शिर्डी) याशिवाय राज्यातील तिन्ही पक्षाचे अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!