माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाची दुसरी लाट देशभरात बरोबरच महाराष्ट्रातही होऊ लागली आहे गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आली होती. त्यामुळे सर्व व्यवहार बंद होते शेती क्षेत्रालाही निर्बंधाचा मोठा फटका बसला आहे.
हळूहळू रुग्ण संख्या आटोक्यात येत असताना मार्केट सुरू झालेले आहे अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे कांदा पीक लागवड करतात आणि आता कुठे तरी कांदा पिकाचे उत्पन्न मार्केट सुरू झाल्यानंतर कांद्याचे भाव पुन्हा वाढ होताना त्याला मिळत आहे.
राहाता येथील बाजार समितीत सोमवारी कांद्याच्या 19 हजार 528 कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याचे भावातील तेजी कायम आहे.राहाता बाजार समितीत 19 हजार 528 कांदा गोण्यांची आवक झाली.
कांद्याचे प्रतवारीनुसार बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये : एक नंबर कांद्याला १८०० ते २४००, दोन नंबर कांद्याला १२५० ते १७५०, तीन नंबर कांद्याला ५०० ते १२००, गोल्टी कांद्याला १४०० ते १६००, जोड कांद्याला 300 ते 500.
शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन राहाता बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.