Thursday, August 11, 2022

ब्रेकिंग: कार व डंपरचा भीषण अपघात ; नगर जिल्ह्यातील तिघे ठार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सिन्नर-शिर्डी महामार्गावर कार व डंपरच्या धडकेत कारमधील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १३) सकाळी अकराच्या सुमारास दातली (ता. सिन्नर) एमआयडीसी परिसरात घडली.

सिन्नरकडून शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या हायवा डंपरने (एमएच-१७-बीडी-७५५५) शिर्डीहून सिन्नरकडे येणाऱ्या इंडिगो कारला (एमएच-१२-सीके-९०३०) समोरासमोर धडक दिली.या अपघातात इंडिगो कारचालक रवींद्र गंगाधर रावळ (वय ४१, रा. लक्ष्मीनगर, कोपरगाव), भागेश अनंत जोशी (५०, रा.कोळपेवाडी) व

लीलावती अनंत जोशी (७५, रा. कोळपेवाडी, कोपरगाव) हे तिघे गंभीर जखमी झाले.त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच कोपरगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक गरुड तपास करीत आहे. मृत कारचालक व प्रवासी कोपरगाव तालुक्यातील रहिवासी आहेत.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!