Thursday, August 11, 2022

२४ तासात महाराष्ट्रात कोरोनाने तब्बल इतक्या रुग्णांचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. तर, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळून येत आहे.

राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) देखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून करोना निर्बंध देखील शिथिल करण्यात आलेले आहेत. दरम्यान, मागील २४ तासात राज्यभरात १४ हजार ७३२ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ८ हजार १२९ नवीन करोनाबाधित आढळून आले. तर, २०० रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या १,४७,३५४ आहे. तर, आजपर्यंत ५६,५४,००३ रूग्ण करोनातून बरे झाले असून, १,१२,६९६ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. राज्याचा मृत्यू दर १.९० टक्के आहे. तर, राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५९,१७,१२१ झाली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ३,८२,१५,४९२ नमुन्यांपैकी ५९,१७,१२१ नमुने (१५.४८ टक्के) करोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. राज्यात सध्या ९,४९,२५१ जण गृहविलगीकरणात आहेत, तर ५ हजार ९९७ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!