Thursday, August 11, 2022

मोठी बातमी :महाराष्ट्रातून या दोन जणांना केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता किती?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता जोर धरु लागलीय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली.

अशावेळी आता महाराष्ट्रातून दोन मोठी आणि महत्वाची नावं समोर येत आहेत. त्यात खासदार नारायण राणे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील एका नेत्याचं केंद्रीय मंत्रिपद जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय.

मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान दिलं जाऊ शकतं असं सांगण्यात येत आहे. निरोप आल्यावर केंद्रात जाऊ, अशी प्रतिक्रियाही राणे यांनी दिली आहे. त्यामागे नारायण राणे हे राज्यातला मराठा समाजातील मोठा चेहरा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात भाजपने रान पेटवलं असताना

नारायण राणे यांना केंद्रात स्थान देत महाविकास आघाडी सरकार आणि खास करुन शिवसेनेला जेरीस आणण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केलाय.

नारायण राणे यांना मंत्रिपद दिल्यास भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरेल. तसंच राणे यांच्या उपयुक्तेपेक्षा उपद्रवमूल्य जास्त आहे. राणे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांचाही भाजप विचार करेल. त्यामुळे राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल, याबाबत साशंकता असल्याचं आवटे म्हणाले.

मोदींच्या मंत्रिमंडळात प्रीतम मुंडेंना स्थान मिळणार?

मोदींच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अशावेळी महाराष्ट्रातून प्रीतम मुंडे हा मोठा चेहरा आहे. तसंच त्यांच्यामागे गोपीनात मुंडे यांचा मोठा वारसा आहे. राज्यातील ओबीसी चेहरा म्हणूनही प्रीतम मुंडे यांच्याकडे पाहिलं जात आहे.

त्यामुळे कदाचित केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान दिलं जाऊ शकतं, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!