Wednesday, August 17, 2022

संभाजीराजेंच्या त्या भूमिकेला रोहित पवारांचा पाठिंबा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार आले होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुढाकार घेतला आहे आणि तो योग्य आहे. या प्रश्नावर सत्ताधारी किंवा विरोधक यापैकी कोणीही राजकारण करू नये. युवकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.

कोणीतरी एक व्यक्ती पुढाकार घेत असेल तर त्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे. म्हणजे ती व्यक्ती केंद्र व राज्य सरकार या दोघांशी याठिकाणी बोलेल.यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे. राज्य सरकार सोबत त्यांची चर्चा सुरू आहे.

मात्र कोणीतरी सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा पेपरमध्ये बातम्या याव्यात यासाठी हव्यास म्हणून जर काही वक्तव्य करत असेल किंवा यामध्ये राजकारण करू पाहत असेल तर हे योग्य नाही. त्यांनी असे करू नये. उलट या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया, असे पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!