Thursday, August 11, 2022

नगर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभेत आठवण येताच हे सदस्य ढसाढसा रडले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा काल छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये घेण्यात आली. यावेळी अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, विषय समित्यांचे सभापती सुनील गडाख, काशिनाथ दाते, मीराताई शेटे व उमेश परहर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यामध्ये जिल्हा परिषदेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असताना त्याचा फायदा मात्र जिल्हा परिषदेला मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक बँक, ग्रामसेवक पतसंस्था तसेच इतर कर्मचारी पतसंस्थांची वसुली थांबवण्यात यावी, अशी मागणी करत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेतली.

त्यामुळे लवकरच जिल्हा परिषदेचे अधिकारी-पदाधिकारी तसेच संबंधित संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करून यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी या विषयावर शासनाकडून ही मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या दिवंगत सदस्यांच्या आठवणी भाजपचे प्रतोद जालींदर वाकचौरे भावक झाले. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य मंडळातील तीन सदस्यांना करोनाने हिरावून घेतले. त्यांच्या आठवणींना उजाळा देतांना वाकचौरे यांना अश्रु अनावर झाले. करोनाने अनेक कुटूंबाचे जीवन बदलून टाकले.

अनेक जवळच्या माणसांना आपण मुकलो. यामुळे करोनावर लसीकरण हाच एकमेंव उपाय सुरू आरोग्य खात्याने गांर्भीयाने लसीकरण करून घ्यावे. अकोले तालुक्यात ठाकर आणि महादेव कोळी समाज करोना लस घेण्यास तयार नाहीत. या समाजाचे प्रबोधन करून त्यांचे लसीरकणाची मागणी त्यांनी यावेळी केली.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!