माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरातील गुलमोहर रोड परिसरात घरात घुसून नोकरदार महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विलास प्रभाकर साळवे (रा. भिंगार, नगर)
याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला घरी असताना विलास साळवे त्याच्या दुचाकीवरून फिर्यादी यांच्या घरी आला.घराच्या बाहेर फिर्यादी यांचे पती उभे होते. साळवे याने त्यांना शिवीगाळ करून घरात प्रवेश केला. तो फिर्यादीला म्हणाला, तुझ्यामुळे माझी नोकरी गेली आहे, असे म्हणत फिर्यादीसोबत गैरवर्तन केले.
शिवीगाळ, मारहाण करत दमदाटी केल्याचे पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक ए. पी. इनामदार करीत आहेत.