Thursday, August 11, 2022

शेतकऱ्यांना होणार जबरदस्त लाभ : राज्य सरकारचा मोठा निर्णय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांना चाप लावण्यासाठी महाविकासआघाडी सरकारकडून नवे धोरण आखले जात आहे.

त्यामुळे विमा कंपन्यांच्या मनमानीला चाप बसून शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.त्यानुसार राज्य सरकार पीक विमा वितरणासाठी नफा आणि तोटा कॅपिंग सिस्टम आणण्याच्या विचारात आहे. त्यासाठी राज्य सरकार नवे धोरण आखत आहे.

या धोरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा अधिक फायद मिळणार आहे. गेल्यावर्षी पीक विमा कंपन्यांनी 5800 कोटीपैकी केवळ 900 कोटी रुपयांच्या रकमेचे वितरण केले होते. त्यामुळे सरकार विमा कंपन्याच्या मनमानीला चाप लावण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

दरम्यान कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार घटला असतानाच आता भारतातील कांदा उत्पादकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याला फारशी मागणी नसली तरी भारतातून निर्यात होणारा कांद्याला  गरजेइतकी बाजारपेठ उपलब्ध होत आहे.

मात्र, आता पाकिस्तानचा स्वस्त कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाल्याने भारतीय निर्यातदारांसमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनामुळे अनेक देशात लॉकडाऊन असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याला फारशी मागणी नाही. दरवर्षी भारतामधून 37 हजार कंटेनरद्वारे कांद्याची निर्यात केली जाते.

मात्र, यंदा हे प्रमाण 12 हजार कंटेनर्सपर्यंत म्हणजे जवळपास 70 टक्क्यांनी घसरले आहे. अशातच आता पाकिस्तानी कांद्याची स्पर्धा निर्माण झाल्याने भारतीय कांदा उत्पादकांसाठी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!