Thursday, August 11, 2022

नगर जिल्ह्यातील त्या आत्महत्या केलेल्या शिक्षिकेच्या पर्समध्ये सापडली ही वस्तू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात राहणाऱ्या एका शिक्षिकेने इमामपूर शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वंदना रेपाळे असं या शिक्षिकेचं नाव असून त्या धनगवाडी येथील शाळेत नोकरीला होत्या.

नगर-औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर परिसरात विहिरीत महिलेचा मृतदेह सोमवारी आढळून आला होता. ही माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. सुरुवातीला त्या महिलेबद्दल गावकऱ्यांना काहीच माहिती नव्हती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढला.

त्यानंतर तपास सुरू झाला. शेवटी मृत महिलेची ओळख पटली. वंदना रेपाळे (रा. पाइपलाइन) असं त्यांचं नाव असून त्या धनगरवाडी येथे शिक्षिका होत्या, असं पोलिसांनी सांगितलं आहे.वंदना रेपाळे या गेल्या चार दिवसापासून बेपत्ता होत्या. याबाबत नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे.

विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यांच्या पर्समध्ये ही सुसाईड नोट सापडली. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘मला मणक्याचा त्रास असल्याने आत्महत्या केली आहे.’ याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी माहिती दिली आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!