Thursday, August 11, 2022

नगर जिल्ह्यातील त्या’ बनावट हॉस्पिटल वर कार्यवाही करा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: स्वतः वैद्यकीय पेशात नसताना हॉस्पिटल चालवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार अनेक शहरात पाहावयास मिळाले आहेत. तसाच प्रकार केडगाव मध्येही चालू असून येथील रेणुकामाता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे डॉ. प्रिती राजेंद्र हंगे यांचे असताना त्यांनी हे हॉस्पिटल संदीप वाळुंज यांना कामकाज पाहण्यासाठी दिले आहे.

आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगेंच्या पाठबळावर हे हॉस्पिटल चालू असून बनावट प्रमाणपत्राच्या आधारे हॉस्पिटल चालवून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण केला व कोरोना रुग्णांचा जीव गेल्याप्रकरणी  डॉ. प्रीती हंगे, संदीप वाळूंज व मनपा कर्मचारी औटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा,

याबाबत महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनी दुर्लक्ष केले असल्यामुळे त्यांच्यावरही ही कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.भांबरकर यांनी पोलिस अधीक्षक व आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपा हद्दीत योग्य पदवीधारक वैद्यकीय व्यवसायिक यांनाच हॉस्पिटल चालविण्याचा अधिकार आहे.

असे असतानाही केडगाव या ठिकाणी रेणुकामाता मल्टीस्टेट हॉस्पिटल हे डॉ. प्रीती राजेंद्र हंगे यांच्या नावाने चालू आहे. परंतु डॉ. प्रीती हंगे यांनी स्वतः रुग्णांची देखभाल न करता संदीप वाळुंज हाच त्या ठिकाणी हॉस्पिटलचे कामकाज पाहत होते. तसेच या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता हॉस्पिटलचा नोंदणी दाखल्यावर आरोग्य अधिकारी यांची सही नाही. तर हा दाखला डॉ.प्रिती हंगे, संदीप वाळूंज व मनपा आरोग्य विभागातील

औटी यांनी केवळ स्वतःच्या खाजगी फायद्यासाठी तयार केला असून त्यास तत्कालीन महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची मुक सहमती होती. असे असतानाही या व्यक्तीने संबंधित हॉस्पिटलच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालयातून रेमडेसिविर याची मोठ्या प्रमाणात मागणी करून ते संबंधित हॉस्पिटलच्या नावाने उपलब्ध करून घेतले. हॉस्पिटलमध्ये कोरोना सेंटर सुद्धा चालविले व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण मृत्यू पावले.

मध्यंतरी महापालिका आरोग्य अधिकारी बोरगे व आरोग्य कर्मचारी औटी यांच्याजवळ बेकायदेशीरपणे रेमडेसिविर इंजेक्शन सापडले होते.  ते याच हॉस्पिटलच्या नावाने महापालिकेत जिल्हाधिकार्यांमार्फत उपलब्ध झाले होते. त्यासंबंधि पोलिस चौकशी सुरू आहे. संबंधित घटनेची संपूर्ण माहिती आरोग्य अधिकार्यांना असल्यामुळे ते पोलिस चौकशीला जात नसल्याचे स्मरणपत्रात म्हंटले आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!