Thursday, August 11, 2022

अन् राधाकृष्ण विखे पाटलांनी केली खुप वर्षांपुर्वीची आईची इच्छा आज पुर्ण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागेल त्‍याला हक्‍काचे घर’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेला लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीने प्रत्‍यक्ष कृतीत उतरवून ६० कुटुंबीयांना आहे त्‍याच जागेवर हक्‍काच्‍या घराचा आधार मिळवून दिला आहे.

भाजपाचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आदिवसींना त्यांच्या घराचा ताबा देण्यात आला. सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला.लोणी बुद्रूक गावात सरकारी जागेवरच आदिवासी व इतर समाजातील कुटुंबं गेली अनेक वर्षांपासून राहात आहेत.

पंचायत समितीच्‍या माध्‍यमातून शासकीय योजनेतील घरकुल या कुटुंबीयांना मंजूरही होत होती. परंतू ती जागा त्‍यांच्‍या नावे नसल्‍याने मंजूर झालेली घरकुल अनेकदा रद्द झाली. गावातच राहाणाऱ्या या लोकांना हक्काची घरे मिळावीत अशी सिंधुताई विखे म्हणजे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्या मातोश्रींची इच्छा होती. त्यांच्या हयातीत ती पूर्ण झाली नाही.

अलीकडेच विखे पाटील यांनी प्रयत्न करून ही योजना पूर्णत्वास नेली. आज वाढदिवसाच्या निमित्ताने संबंधित कुटुंबीयांना घराच्या चाव्या देऊन आईची इच्छा पूर्ण करीत असल्याचे ते म्हणाले. सिंधूताई आदिवासी निवारा, असे या गृहप्रकल्पाला नाव देण्यात आले आहे.

यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, ’मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शासकीय पडीक जमिनी घरकुल उभारणीसाठी उपयोगात आणल्या तर वंचित कुटुंबियांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. सरकारने धोरण घेण्याची गरज आहे. अतिशय संघर्षमय परीस्थीतीत ही सर्व कुटंब या जागेत राहात होती.

यांना घर मिळावीत मातोश्री सिंधूताईची खूप इच्छा होती. आज हे स्वप्न पूर्ण होतय याचे मोठे समाधान आहे. या घरकुलांच्‍या बाबतीत असा निर्णय भाजप सरकारच्‍या काळात घेण्‍यात आला. राज्‍यातील हा पहि‍ला निर्णय ठरल्‍याने आहे त्‍याच जागेवर घर रहिवाश्‍यांना घर देण्‍याचा गृह प्रकल्‍प यशस्‍वी होवू शकला,’ असेही विखे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!