Wednesday, August 17, 2022

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी ही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात कोरोना आकडेवारी हळू हळू कमी होत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अनलॉक सुरू आहे. मोठ्या बाजारपेठांमध्ये नागरिकांनी परत गर्दी करणं सुरू केलंय. मात्र कोरोनच्या तिसऱ्या अजूनही कायम आहे. त्यात भर म्हणून आता ‘Delta +’ व्हेरिएंट   आलं आहे.

याचा धोका सर्वात जास्त आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी ICMRकडून सूचना  देण्यात आल्या आहेत.कोरोना व्हायरसच्या या ‘Delta +’ व्हेरिएंटकडे दुर्लक्ष कडून चालणार नाही.  28 प्रयोगशाळांमध्ये या व्हेरिएंटवर संशोधन सुरु आहे. हे व्हेरिएंट किती धोकादायक आहे यावर शोध सुरु आहे.

मात्र या व्हेरिएंटचे रुग्ण कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही असं ICMR कडून सांगण्यात आलंय.गेल्या दीड वर्षांपासून आपण कोरोना व्हायरसचा सामना करत आहोत अंतर आपण त्याला हरवू शकलो नाही. कोरोना व्हायरस अजूनही थकलेला नाही. नवनवीन व्हेरिएंट्समध्ये तो येत आहे. आपल्याकडे या व्हेरिएंट्सना संपवण्याचं शस्त्र नाहीये.

मात्र कोरोनाचे नियम पाळणं आवश्यक आहे असं डॉक्टर विनोद कुमार पॉल त्यांनी म्हंटलंय.जर कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटला थोपवून लावायचं असेल तर आपल्याला नेहमीप्रमाणे मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचं पालन करणे, कंटेनमेंट झोन तयार करणे आणि जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करणे हे उपाय आहेत. तसंच जबाबदारी आणि शिस्त या दोन गोष्टी यात महत्वाच्या आहेत असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!